Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
[§८८
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.



तूं ऐसा कां मीच असोन । त्याहून नलगे आम्हांसि आज ।
तुझ्या ठायीं दासपण । आणीन तरी मी होय ॥
तुवां स्वामी होऊनि बैसावें । आणि आम्हांसभोवतें भोंवावें ।
रागेजोनी बाहता[] न यावें । हे काय बरें ॥
तूं राज्य सांडुनियां जालियां उदास । तरी आम्हीही तुझीच दास ।
तां काय बोलिजेल बापास । तैसें आम्हीही तुज करूं ॥
तुवां पाषाण तारिले । तरी आम्हीही जडजीव उद्धरिले ।
तुवां देव मुक्त केले । बंधनापासूनी ॥
तरी आम्हीही भाविकांसी । सोडवूनियां मोक्षपदासी ।
पावविलें तयांसी । मागुता जन्म नाहीं ॥
तुवां जरामरण केलें दुरी । तें मुळीच नाहीं आमुचे घरीं ।
तूं राजा अकरा सहस्त्रवरी । तरी आम्हांसी संख्या नाहीं ॥
तुवां पुरी नेली वैकुंठा । आम्ही वैकुंठींच्या बारा वाटा ।
करूनि मांडिला चोहटा[] । तया वैकुंठाचा ॥
ऐसे बोलती रामदास । निधडे सर्वस्वे उदास ।
वैभव वाटे जयांस । कसपट जैसें ॥
ऐसें बोलणे ऐकिलें । रामें मंदहास्य केलें ।
धांवोनियां ह्रदयीं धरिलें । आपुलिया निजदासा ॥
ऐसा भक्ताचा वेळाइत[] । दासाभोंवता भोंवत ।
एक क्षणीं न विसंबत । भावार्थ देखोनि भुलला ॥
राम दासांमध्ये उभा । तेणें दासांसी आली शोभा ।
रामस्वरूपाची प्रभा । कोंदाटली सबाह्य ॥

  1. हाक मारणे.
  2. चवाटा.
  3. वेळेनुसार काम करणारा, आज्ञाधारक शिपाई