पान:रामदासवचनामृत.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना ११ 4 नानाप्रकारच्या मार्ति वगैरे " देव * या नांवास योग्य नसून फक्त अंतरात्माच देव आहे असे सिद्ध केले आहे. मूर्तीस लोक चोरून नेतील अगर फोडून टाकतील. अशा प्रकारचे देव नर्मदागंडकातीरी लक्षावधि पडले आहेत, पण खन्याः देवाचें सत्त्व कधीही जाणार नाही असें रामदासांनी लिहिले आहे ( क. ८)... जगामध्ये चार प्रकारचे देव प्रसिद्ध आहेत. एक प्रतिमादेव, दुसरा अवतारदेव, तिसरा अंतरात्मादेव, व चौथा निर्विकारी देव. यांमध्ये निर्विकारीदेवासच देव. म्हणावें असें रामदासांनी लिहिले आहे (क्र. ९). शाईचा व्यापार करून कोठें राज्यसंपदा प्राप्त झाली आहे काय ? म्हणून सुरता करून पाहणे यास देवदर्शन म्हणूं, नये (क्र. १०). खरा देव केवळ सद्रूच्या योगानंच प्राप्त होतो व त्यामुळे नानाप्रकारच्या देवांची भीड पडत नाही ( क. ११). अंतर्दवास चुकून धांवा घेऊन तीर्थास गेले असतां जेथे तेथे केवळ धोंडापाणी दिसेल (क्र. १२). नाना देवांच्या अंतर्भूत असलेल्या आत्मदेवाच्या अनुसंधानाने सर्व किल्मिष जळून जाईल (क. १३ ) असें रामदास म्हणतात. ११. रामदासांचा भुताखेतांवर व चमत्कारांवर अगदीच विश्वास नव्हता. असें दिसत नाही. शापामुळे देहधारण, परकायाप्रवेश, वायुरूपाने देवताभूतांचा अंगी संचार, वायुस्वरूप झोटिंगाच्या लीला, या गोष्टींस अभावाने नेऊ नका: (क्र. १४-१५), फक्त ज्यांस संकल्पच नाही अशा ज्ञात्यांस यांच्याने बाधवत नाहीं (क्र. १६), असें रामदासांचे मत आहे. याच्या उलट, विष्णु म्हणजे केवळ विश्वांतील जाणीव, रुद्र म्हणजे केवळ नेणीव, व ब्रह्मा म्हणजे जाणीवनेणीवेचे संमिश्रण (क्र.१७), अगर ब्रह्मयास जगाची उत्पत्ति, विष्णूस प्रतिपालन,. रुद्रास संहार, अशी जी कामें सोंपवून दिली आहेत ती काल्पनिक असून सगळ्या जगाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता केवळ एक अंतर्देव आहे (क. १८) असें रामदासांचे मत आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश, हा ऐलीकडील विचार, चंद्रसूर्य-- तारांगणे हा ऐलीकडील विचार, नाना देवांचे अवतार हा ऐलीकडील विचार; ही. दृश्ये केवळ देवाचें महाद्वार होत; यांस ओलांडून गेल्यावाचून देवाचे दर्शन व्हावयाचें नाहीं (क्र. २०). ज्याच्यामुळे सूर्यबिंब धांवतें, धुकटामध्ये अगाधः पाणी साचून राहते, काळाचा दूत म्हणून वारा ज्याच्यामुळे धांव घेतो, विजांच्या, तडाख्यांतही जो अंतर्भूत आहे, त्या देवाचीच उपासना ही माझी उपासना आहे असें रामदास म्हणतात (क्र. २१). ज्याचे नांव सर्वकर्ता, ज्याच्यामुळे .. - -