पान:रामदासवचनामृत.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत प्रतापाइतक्या विश्वसनीय नसल्या, तथापि रामदासांची मुख्य शिकवण कोणती, रामदासांस अनुभव कसा प्राप्त झाला, वगैरे गोष्टींबद्दल त्यांतील मजकूर फार विचारणीय आहे. दासबोधविवरण. ९. आता आपण आपल्या प्रस्तुतच्या पुस्तकांत रामदासांच्या ग्रंथांतून जे उतारे घेतले आहेत त्यांच्या अल्पमात्र चर्चेकडे वळू. सर्व विषयाचे संपूर्ण विवेचन करण्यास स्वतंत्र ग्रंथच लिहिला पाहिजे. तथापि या लहानशा प्रस्तावनेंत रामदासवचनामृताचे अल्पमात्र स्वारस्य तरी लोकांस देणे जरूरीचे आहे. क्रमांक १ यांमध्ये रामदासांनी अफझलखानाचे भेटीचे वेळी शिवाजीस केलेला उपदेश ग्रथित केला आहे असें त्यांतील " म्लेंच दुर्जन उदंड । बहुतां दिसांचे माजलें बंड" हे वाक्य, व शिवाजसि देवब ह्मणांची चिंता वाहण्याविषयी उपदेश, यांवरून सिद्ध होत आहे. क्रमांक २ मध्ये रामदासांनी आपल्या वेळेस ब्राह्मणांस अन्नसुद्धा मिळत नव्हते, व म्लेंच्छांनी व अन्य याति यांनी ( अर्थभेद-रणांगणावर ) राज्य पादाक्रांत केले होते असे लिहिले आहे. क्रमांक ३ मध्ये रामदासांनी आपल्या विश्वपाळित्या उपासनेचे वर्णन केलें असून नारायणाचे ध्यान केले असतां लक्ष्मी भक्तांपासून जाणार नाही असें सुचविले आहे. क्रमांक ४ मध्ये दुर्जनांचा संहार करणाऱ्या व भक्तांस आधारभूत अशा देवाचे स्मरण केले असतां मनी इच्छिलेलें कार्य सिद्ध होते; फक्त कर्तृत्वाचा अहंकार आपल्याकडे लावून घेऊ नये असें रामदासांनी सांगितले आहे. १०. क्रमांक ५ पासून ज्ञानचर्चा सुरू झाली आहे. प्रथम क्रमांक ५ मध्ये भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, तर्कमीमांसा, भूतभविष्यज्ञान, दुसन्यांच्या जीवींचे ज्ञान, इत्यादि नानाप्रकारची जी ज्ञाने त्यांस ज्ञान हे नांव योग्य नसून आपलें स्वरूपदर्शन यासच ज्ञान म्हणावें, तोच मुख्य देव जाणावा, महावाक्याचा जप न करितां केवळ विचार करावा, सर्व संतांचें गुह्यज्ञान तें हेंच होय, स्वामी कृपेसहित अंतःकरणांत वसल्यास त्यासच ज्ञान म्हणावें, असें क्रमांक ६ मध्ये लिहिले आहे. क्रमांक ७ यांत अशा ज्ञानाच्या योगाने सर्व पातकांचे भस्म होऊन पुण्य अमूप झाल्याने आपली सीग सांडून जातें असें रामदासांनी लिहिले आहे. नंतर मुख्य देव कोणता याचा विचार सुरूं होऊन IP