पान:रामदासवचनामृत.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- -- minine ८८] जुना दासबोध. श्रीराम जयराम जयजयराम । ऐसा कांहीं एक करूनियां नेम। जप कीजे तेणें आत्माराम । जोडेल नियमें ॥ ३८ ॥ परी कोणासी कळों नेदावा । जप अंतरीच करावा। जैसा कृपणासी धनठेवा । सांपडला एकांतीं ॥ ३९ ॥ राम जपे त्याचे चित्त पाहतो । जप करितां शीण येतो। विकल्प' अंतरीं प्रवेशतो। तरी ढळेना मेरू जैसा ॥ ४०॥ कां प्रपंची होती थोर आघात । तेणें चित्त होय दुश्चित । देहासी आपदा होती अत्यंत । तरी रामासि विसरूं नये ॥४१॥ जप नेमिला तो चुकों नेदावा । त्यावेगळा सर्वदा स्मरावा ! मळत्यागीही न विसंबावा । कर्मठपणे करूनि ॥ ४२ ॥ ऐसे अखंड नाम स्मरावें । परी दुसरियासी कळों नेदावें। निदिध्यास लागलियां राघवें । पाविजे तात्काळ ॥ ४३ ।। वैरें निदिध्यास रावणे केला । त्याचा संकल्प त्यासी फळला।। मा जेणें दास्यत्वे उपासिला । तो राम कैसा नव्हे ॥४४॥ कांहीं साक्षात्कार झाला । तो सांगों नये दुसरियाला। जरी ओळकेपणे सांगितला । तरी पुन्हां होणार नाहीं ॥ ४५ ॥ पुन्हां साक्षात्कार कैंचा। जाला तरी वरपंगाचा। हा मी आपुले जीवाचा । अनुभव सांगतों ॥ ४६॥ जु. दा. १५. ३७-४६. ८८. रामास मागणे. रामासि इतुकें मागावें । जे आपण रामचि व्हावें। कां रामासि दास करावें । आपणा ऐसें॥ १ संशय. २ आशाळभूतषमा, मूर्खपणा. ३ वरवरचा, दिखाऊ. TETTET TITION