Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
[§८५
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.



सर्वस्वाची आस तुटे । तरीच सगुणमूर्ति प्रगटे ।
दुःख संसारींचें फिटे । एकसरा ॥२१ ॥

जु. दा. ७. १३-२१.

८६. प्रपंचपरमार्थ.

गृहासी आग लागली । देखोनि कां बोंब केली ।
लोकांची मांदी मेळविली । आगी विझवाया कारणें ॥
तैसी परमार्थी बोंब मारावी । कांहीं काढाकाढी करावी ।
हळू हळू सोडवावी । मिठी प्रपंचाची ॥
प्रपंचधुडका[] पेटला । मध्ये परमार्थ जळूनि गेला ।
ऐसें देखोनि तुम्हांला । कैसे बरे वाटते ॥
मुक्ताफळ आणि दिव्यांबर । नाना वस्तूंचे भांडार ।
भस्म करूनि वैश्वानर । विझोनि जाई जेंवीं ॥
तैसा प्रपंच हा परमार्थासी । जाळोनि भोगू नेदी आपणांसी ।
आयुष्य गेलियां प्राणियासी । विमुख होय ॥
जरी हा प्रपंच शाश्वत जाणतो । तरी आम्ही यासीच धरितों ।
हा अशाश्वत म्हणोनि रडतों । तुम्हां भोंवतीं ॥
तुम्हीं कैसे रे परमार्थी । परघात आणि अपस्वार्थी ।
डोळे झांकूनि दोहीं अर्थी । नागवलेत की रे ॥

जु. दा. ११. ५४-६०.

८७. अनुभव सांगू नये.
आताही जयास वाटे भेटावें । रामें मज सांभाळीत जावें ।
ऐसें दृढ घेतलें जीवें । तरी ऐका मी सांगेन ॥ ३७॥

  1. अग्नि, वणवा.