पान:रामदासवचनामृत.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [८३ लोकी लोक वाढविले । तेणें अमर्याद जाले । भूमंडळी सत्ता चाले। गुप्तरूपें ॥ २६॥ ठाई ठाई उदंड तांबे । मनुष्यमात्र तितुके झोंबे । चहुंकडे उदंड लांबे । परमार्थबुद्धी॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळी थोर थोर। प्रत्ययाने प्राणीमात्र । सोडविले ॥ २८॥... ऐसे कैवार्ड उदंड जाणे। तेणें लोक होती शाहाणे । जेथे तेथे प्रत्यये बाणे । प्राणिमात्रांसी ॥ २९॥ ऐसी कीर्ति करून जावें । तरीच संसारास यावें । दास म्हणे हे स्वभावें । सेकेतें बोलिलें ॥ ३०॥ __दा. १५. २. १-३०. ५. उपसंहार. ८४. " समर्थकृपेची वचनें । तो हा दासबोध." जाले साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥२६॥ हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा। साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं॥२७॥ स्वमीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें। सहजचि अनुवाच्य जालें । बोलतां नये ॥२८॥ ऐसें हें विवेके जाणावें। प्रत्यये खुणेसी बाणावें। जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९॥ १ संमुदायं. २ प्रकार, युक्त्या .