पान:रामदासवचनामृत.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A . 53] कर्मयोग. १४७ नाना जिनस उदंड पाठ । वदों लागला घडधडाट। अव्हाटचि केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥ प्रबोधशक्तीची अनंत द्वारें। जाणे सकळांची अंतरें। निरूपणे तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥ मते मतांतरें सगट । प्रत्यये बोलोन करी सपाट । दंडक सांडून नीट । वेधी जना ॥ १७ ॥ नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें । उदास वृत्तीच्या गुमानें । उठोन जातो॥१८॥ प्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला । नाना मार्ग सांडूनि त्याला । शरण येती ॥ १९॥ परी तो कोठे आडळेना । कोणे स्थळी सांपडेना । वेष पाहतां हीनदीना। सारिखा दिसे ॥ २०॥ उदंड करी गुप्तरूपें । भिकान्यासारिखा स्वरूपें। तेथे येशकीर्तिप्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥ ठाई ठाई भजन लावी। आपण तेथून चुकावी। मत्सर मतांची गोवी । लागोंच नेदी ॥ २२ ॥ . खनाळामधे जाऊन राहे । तेथे कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥ २३ ॥ अवघड स्थळी कठीण लोक । तेथें राहणे नेमक। सृष्टीमधे सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥ तेथे कोणाचें चालेना । अणुमात्र अनुमानेना। कॅट्ट घालून राजकारणा । लोक लावी ॥२५॥ १३चे. २ अफाट, विस्तीर्ण. ३ अनुभव. ४ रूढि. ५ जोराने. ६ दया, दुर्घटस्प, ७निश्चय.