पान:रामदासवचनामृत.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। १४९ For ] उपसंहार. . भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेची वचनें । तो हा दासबोध ॥ ३०॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारे घेतां शोध। मननकर्त्यास विशद। परमार्थ होतो ॥ ३१॥ वीस दशक दोनीसे समास । साधकं पाहावें सावकास । विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचे कार्य प्रयोजन। येथे प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥ देहे तंव पांचा भूतांचा। कर्ता आत्मा तेथींचा। आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी॥३४॥ सकळ करणे जगदीशाचें । आणी कवित्वचि काय मानुशाचें। ऐशा अप्रमाण बोलण्याचें । काये घ्यावें ॥ ३५ ॥ सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला । तेथे कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६॥ ऐसी हे विचाराची कामें। उगेंच भ्रमों नये भ्रमें। जगदेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७॥ दा. २०. १०. २६-३७. का -- - - - - १दोनशे - --