Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
[§८३
रामदासवचनामृत-दासबोध
मऱ्हाष्टदेश थोडा उरला । राजकारणे लोक रुधिला ।
अवकाश नाही जेवायाला । उदंड कामें ॥ ४ ॥
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त जाले ।
रात्रंदिवस करूं लागले। युद्धचर्चा ॥ ५ ॥
उदिम्यास[] व्यासंग लागला । अवकाश नाहीसा झाला ।
अवघा पोटधंदाच लागला । निरंतर ॥६ ॥
शडदर्शनें[] नाना मते । पाषांडे वाढली बहुतें ।
पृथ्वीमधे जेथतेथें । उपदेसिती ॥ ७ ॥
स्मार्थी आणि वैष्णवीं । उरली सुरली नेली आघवीं ।
ऐसी पाहातां गथागोवी । उदंड जाली ॥ ८ ॥
कित्येक कामनेचे भक्त । ठाई ठाई जाले आसक्त ।
युक्त अथवा अयुक्त । पाहातो कोण ॥ ९ ॥
या गल्बल्यामध्ये गल्बला[] । कोणी कोणी वाढविला ।
त्यास देखों सकेनासा जाला । वैदिक लोक ॥ १० ॥
त्याहिमधे हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन ।
प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । कोण पाहे ॥ ११ ॥
याकारणें ज्ञान दुल्लभ । पुण्ये घडे अलभ्य लाभ ।
विचारवंतां सुल्लभ । सकळ कांहीं ॥ १२ ॥
विचार कळला सांगतां नये । उदंड येती अंतराये ।
उपाय योजितां अपाये । आडवे येती ॥ १३ ॥
त्याहिमधे जो तिक्षण[] । रिकामा जाऊ नेदी क्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । सकळां माने ॥ १४ ॥

  1. व्यापारी.
  2. सहा दर्शनें.
  3. गडबड.
  4. तीव्रबुद्धीचा.