पान:रामदासवचनामृत.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८3 ] कर्मयोग. कांहीं येक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण। उगेंच वणवण हिंडोन । काय होतें ॥ २४॥ नाहीं देह्याचा भरवसा । केव्हां सरेल वयसा। प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥ याकारणे सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें।। भगवत्कीर्तीने भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आपणास जें जें अनुकूळ । तें तें करावें तत्काळ । होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ २७ ॥ विवेकामधे सांपडेना। ऐसें तो कांहींच असेना। येकांती विवेक अनुमाना । आणून सोडी ॥२८॥ अखंड तजवीजा चाळणा जेथें । पाहतां काये उणें तेथें: येकांविण प्राणीयांतें। बुद्धि कैंची ॥ २९॥ येकांती विवेक करावा । आत्माराम वोळखावा । येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३०॥ ___ दा. १९. ६. ११-३०. ८३. रामदासांचे आत्मचरित्र. पृथ्वीमधे मानवी शरीरें । उदंड दाटली लहानथोरें। पालटती मनोविकारें। क्षणक्षणा ॥१॥ जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती। सारिख्या नस्ती आदिअंतीं। नेमाच नाहीं पाहावे किती। काये म्हणोनि ॥२॥ कित्येक म्लेंच होऊन गेले। कित्येक फिरंगणांत आटले। देशभाषेनें रुधिले । कितीयेक ॥३॥ १ आयुष्य. २ फिरंगी लोकांचा देश. ३ नाडले.