Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४
[§८२
रामदासवचनामृत-दासबोध
परांतर रक्षायाची कामें । बहुत कठीण विवेकवर्मे ।
स्वइच्छेने स्वधर्मे । लोकराहाटी[] ॥ १२ ॥
आपण तुरुक गुरु केला । शिष्य चांभार मेळविला ।
नीच यातीने नासला । समुदाय ॥ १३ ॥
ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या ।
संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥
उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळित अवघेचि टाकावें ।
निस्पृहपणे विख्यात व्हावें । भूमंडळी ॥ १५ ॥
अक्षर बरे वाचणे बरें । अर्थातर सांगणे बरें ।
गाणे नाचणे अवघेचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥
दीक्षा बरी मीत्री[] बरी । तीक्षण बुद्धि राजकारणी बरी ।
आपणास राखे नानापरी । अलिप्तपणे ॥ १७ ॥
उदंड हरिकथेचा छंदु । सकळांस लागे नामवेदु[]
प्रगट जयाचा प्रबोधु । सूर्य जैसा ॥ १८ ॥
दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निवऊं जाणे ।
सकळांचें मनीचे जाणे । ज्याचे त्यापरी ॥ १९ ॥
संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे ।
अखंड अभ्यासी लगटे । समुदाय ॥ २० ॥
जेथे तेथे नित्य नवा । जनासी वाटे हा असावा ।
परंतु लालचीचा गोवा । पडोंचि नेदी ॥ २१ ॥
उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट च्यातुर्य उत्कट भजन ।
उत्कट योग अनुष्ठान । ठाई ठाई ॥ २२ ॥
उत्कट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगांती फांकली ।
उत्कट भक्तीने निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥

  1. वहिवाट.
  2. मैत्री.
  3. वेध.