पान:रामदासवचनामृत.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१] रामदासवचनामृत-दासबोध. [ बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे । उणे कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥ चौदा विद्या चौसष्टी कळा । जाणे संगीत गायेनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥ सकळांसी नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणीयेकाचे उणें । पडोंचि नेदी॥१३॥ न्याय नीति भजन मर्यादा । काळ सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥ उत्तमगुणे शृंघारला । तो बहुतांमधे शोभला । प्रगट प्रतापें उगवला। मार्तड जैसा ॥१५॥ जाणता पुरुष असेल जेथें । कळ्हो कैचा उठेल तेथे । उत्तम गुणाविषयी रितें । तें प्राणी करंटें ॥१६॥ प्रपंची जाणे राजकारण । परमार्थी साकल्यविवरण। सर्वामधे उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥ मागें येक पुढे येक । ऐसा कदापी नाही दंडक । सर्वत्रांसी अलोलिक । तया पुरुषाची ॥ १८ ॥ अंतरासी लागेल ढका। ऐसी वर्तणूक करूं नका। जेथें तेथें विवेका। प्रगट करी ॥१९॥ कर्मविधी उपासनाविधी । ज्ञानविधी वैराग्यविधी । विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी । चळेल कैसी ॥२०॥ पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥२१॥ १ वाट, २ रिवाज, रीत. ३ आवड,