या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§८१ ]
१४१
कर्मयोग.
आपणास उपाधी मुळीच नाही । रुणानुबंधे मिळालीं सर्वही ।
आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जाले पाहिजे ॥ २७ ॥
जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊन बैसला ।
आटोपेना तो गल्बला । कासयासी ॥ २८ ॥
काहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठित जावा काळ ।
जेणेकरितां विश्रांति वेळ । आपणासि फावे ॥ २९ ॥
उपाधी कांहीं रहात नाहीं । समाधानायेवढे थोर नाहीं ।
नरदेह प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणा ॥ ३० ॥
दा. १९. ८. १९-३०,
८१. समर्थलक्षण.
तो सकळ जनासी व्हावा । जेथे तेथें नित्य नवा ।
मूर्खपणे अनुमान गोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
नाना उत्तम गुण सत्पात्र । तेचि मनुष्य जगमित्र ।
प्रगट कीर्ती स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥ ६ ॥
राखे सकळांचे अंतर । उदंड करी पाठांतर ।
नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥
नम्रपणे पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे ।
बोलाऐसें वर्तो जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥
जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी ।
धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥ ९ ॥
तो परोपकार करितचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला ।
मग काये उणे तयाला । भूमंडळीं ॥ १० ॥