पान:रामदासवचनामृत.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। १४० रामदासवचनामृत-दासबोध घटसी आणावा धट । उद्धटासी पाहिजे उद्धट । खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥ जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्याल सी थाटे। इतुकें होतें परी धनी कोठे । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥ दा. १९. ९. २०. “ काही गमला काही निवळ । ऐसा कंठित जावा काळ. " ज्यासी उपाधी आवरेना । तेणें उपाधी वाढवावी ना। सावचित्त करूनिया मना । समाधाने असावें ॥ १९ ॥ धावांवों उपाधी वेष्टी । आपण कष्टी लोकहि कष्टी। हे कामा नये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० लोक बहुत कष्टी जाला । आपणही अत्यंत त्रासला। वेर्थचि केला गल्बला । कासयासी ॥ २१ ॥ असो उपाधीचे काम ऐसें । कांहीं बरें कांहीं कोणोंसें। सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२॥ लोकांपासीं भावार्थ कैंचा । आपण जगवावा तयांचा। शेवट उपंढर कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥ अंतरात्म्याकडे.सकळ लागे । निर्गुणी हे कांहींच नलगे। नाना प्रकारीचे दगे। चंचळामधे ॥ २४॥ शुद्ध विश्रांतीचे स्थळ । ते येक निर्मळ निश्चळ। . तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५॥ उद्वेग अवघे तुटोन जाती। मनास वाटे विश्रांति । ऐसी दुल्लभ परब्रह्मास्थिति । विवेकें सांभाळावी ॥२६॥ १ वावदूक. २ मजलस, सभा. ३ कुरकुर. ४ वाकडे. ५ दंभस्फोट..