पान:रामदासवचनामृत.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३९ - -- 3 ६७९] कर्मयोग. मुख्य सूत्र हातीं ध्यावें । करणें तें लोकांकरवी करवावें । कित्तेक खलक उगवावे । राजकारणामधे ॥ १८ ॥ ग्रामण्य वर्मी सांपडावें । रगडून पीठचि करावें। करूनि मागुती सांवरावें । बुडऊं नये ॥२०॥ खळदुर्जनासी भ्यालें । राजकारण नाहीं राखिलें। तेणे अवघे प्रगट जालें । बरे वाईट ॥२१॥ समुदाव पाहिजे मोठा । तरी तनावां असाव्या बळकटा। मठ करूनि ताठा । धरूं नये ॥२२॥ दुर्जन प्राणी समजावे। परी ते प्रगट न करावे। सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देउनी ॥ २३ ॥ जनामधे दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटपट। याकारणे ते वाट । बुझुनि टाकावी ॥ २४॥ गनीमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुफुरिती भुजा। ऐसा पाहिजे की राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५ ॥ तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाखे। सहजचि होती ॥२६॥ हे धूर्तपणाची कामें। राजकारण करावें नेमें। ढिलेपणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥२७॥ कोठेच पडेना दृष्टीं । ठाई ठाई त्याच्या गोष्टी। वाग्विळासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥२८॥ हुन्यास हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा।। लौंदास पुढे उभा करावा। दुसरा लौंद ॥२९॥ - - १ कांटे. २ नाणणा-या देया. ३ कैवारी. ४ घाटगंग.