पान:रामदासवचनामृत.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ रामदासवचनामृत-दासबोध. [७९. अखंड राहता सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते । याकारण विश्रांतीतें। घेतां नये ॥६॥ आळसे आळस केला । तरी मग कारबारचि बुडाला। अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥७॥ उदंड उपासनेची कामें। लावीत जावी नित्यनेमें । अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥ ८॥ या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हतां कष्टी। राजकारणे मंडळ वेष्टी। चहुंकडे ॥१०॥ नष्टासी नट योजावे । वाचाळासी वाचाळ आणावे। आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंच नेदी ॥ ११॥ कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों नेदावी। कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥१२॥ न कळता करी कार्य में तें । तें काम तत्काळचि होतें। गचगचेत पडतां तें। चमत्कारें नव्हे ॥१३॥ ऐकोनी आवडी लागावी । देखोनी बळकटचि व्हावी । सलगीने आपली पदवी । सेवकामध्ये ॥ १४ ॥ कोणी येक काम करितां होते। न करितां ते मागे पडतें। याकारणे ढिलेपण ते । असोंचि नये ॥१५॥ जो दुसन्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला। जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६॥ अवध्यांस अवधे कळलें । तेव्हां तें रितें पडिलें। याकारणें ऐसे घडलें। न पाहिजे कीं ॥१७॥ १ व्याप, १ बाघळटपणा. ३ अतिविचार.