Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§७९ ]
१३७
कर्मयोग.

कीर्ति पाहातां सुख नाहीं । सुख पाहाता कीर्ति नाहीं ।
केल्याविण कांहींच नाहीं । कोठे तरी ॥ २५ ॥
येरवीं काय राहाते । होणार तितुकें होऊन जातें ।
प्राणी मात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥
आधींच तकवा सोडिला । मधेचि धीवसा[] सांडिला ।
तरी संसार हा सेवटाला । कैसा पावे ॥ २७ ॥
संसार मुळीच नासका । विवेकें करावा नेटका ।
नेटका करितां फिका । होत जातो ॥ २८ ॥
ऐसा याचा जिनसाना[] । पाहातां कळों येतें मना ।
परंतु धीर सांडावा ना । कोणीयेकें ॥ २९ ॥

दा. १९. १०. ८-२९.

७९. राजकारणनिरूपण.
ज्ञानी आणी उदास । समुदायाचा हव्यास ।
तेणें अखंड सावकास । येकांत सेवावा ॥१ ॥
जेथें तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती ।
प्राणीमात्रांची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥
जरी हा चाळणाचि करीना । तरी काहींच उमजेना ।
हिसेबझाडाचि पाहीना । दिवाळखोर ॥ ३ ॥
येक मिरासी साधिती । येक सीध्या गवाविती[]
व्यापकपणाची स्थिती । ऐसी आहे ॥ ४ ॥
जेणें जें जें मनीं धरिलें । तें तें आधींच समजलें ।
कृत्रिम अवघेचि खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥

  1. धीर.
  2. स्वभाव.
  3. गमाविती.