पान:रामदासवचनामृत.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। १३६ रामदासवचनामृत-दासबोध. [६५८ जितुकें कांही आपणास ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें। शाहाणे करून सोडावे । बहुत जन ॥१४॥ परोपरी सिकवणे । आडणुका सांगत जाणे। निवळ करून सोडणें । निस्पृहांसी ॥१५॥ होईल ते आपण करावें । न होतां जनाकरवी करवावें । भगवद्भजन राहावें । हा धर्म नव्हे ॥१६॥ आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें। आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥ जुन्या लोकांचा कंटाळा आलातरी नूतन प्रांत पाहिजे धरिला। जितुकें होईल तितुक्याला । आळस करूं नये ॥ १८॥ देह्याचा अभ्यास बुडाला । म्हणिजे महंत बुडाला। लागवेगें नूतन लोकांला । शाहाणे करावें ॥ १९ ॥ उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये । निसुगपंण कामा नये । कोणीयकविषीं ॥ २० ॥ काम नासणार नासतें। आपण वेडें उगेंच पाहातें। आळसी हृदयसुन्य तें । काये करूं जाणे ॥ २१ ॥ धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला। नाना बुद्धी शक्ताला । म्हणोनि सिकवाच्या ॥२२॥ व्याप होईल तो राहावें। व्याप राहातां उठोन जावें। आनंदरूप फिरावें । कोठे तरी ॥ २३॥ . उपाधीपासूनि सुटला । तो निस्पृहपणे बळावला। जिकडे अनुकूल तिकडे चालिला। सावकास ॥ २४ ॥ - - १ कंटाळा. २ उद्योग.