पान:रामदासवचनामृत.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६५ ७] कर्मयोग. वेड्यास वेडे म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये। तरीच घडे दिग्विजये। निस्पृहासी ॥ २६ ॥ उदंड स्थळी उदंड प्रसंग । जाणोनि करणे येथासांग । प्राणिमात्रांचा अंतरंग । होऊन जावें ॥ २७॥ मनोगत राखों न जातां। परस्परें होये अवस्ता। मनोगत तोडितां वेवस्ता । बरी नाहीं ॥ २८ ॥ याकारणे मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥ २९ ।। दा, १३. १०. २०-२९. ७८. विवेकनिरूपण. उपासना करूनियां पुढें । पुरवले पाहिजे चहूंकडे । भूमंडळी जिकडे तिकडे । जाणती तया ॥८॥ जाणती परी आडळेना । काय करितो ते कळेना। नाना देसीचे लोक नाना । येऊन जाती॥९॥ तितुक्यांची अंतरें धरावीं। विवेकें विचारें भरावीं। कडोविकेडीची विवरावी । अंतःकर्णे ॥१०॥ किती लोक ते कळेना । किती समुदाय आकळेना। सकळ लोक श्रवणमनना । मधे घाली॥११॥ फ. समजाविस करणे । गद्यपद्य सांगणे। । परांतरासी राखणे । सर्वकाळ ॥ १२ ॥ ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणे विवेक । सावधापुढे अविवेक । येईल कैंचा ॥१३॥ . १ व्यवस्था, स्थिति. २ धरसोडीची. ३ समुदाय. ४ समजूत.