पान:रामदासवचनामृत.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ रामदासवचनामृत-दासबोध. [Fe हैं आवघे आपणांपासीं । येथे बोल नाहीं जनासी। सिकंवा आपल्या मनासी।क्षणक्षणा ॥ २३ ॥ खळ दुर्जन भेटला। क्षमेचा धीर बुडाला। तरी मौनेंचि स्थळत्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥ लोक नाना परीक्षा जाणती। अंतरपरीक्षा नेणती। तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥ आपणास आहे मरण । म्हणोन राखावें बरेपण। काठिण आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥ - दा. १२. २. १५-२६. ७७. शिकवणनिरूपण. तैसें निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदई धरावें। सत्कीर्तीने भरावें । भूमंडळ ॥२०॥ उत्तमासि उत्तम माने । कनिष्ठांस तें न माने। म्हणौन करंटे देवाने । करून ठेविले ॥२१॥ सांडा अवघे करंटपण । धरावें उत्तम लक्षण । हरिकथा पुराण श्रवण । नीति न्याये ॥ २२ ॥ वष्याचा विवेक । राजी राखणे सकळ लोक। हळु हळु पुण्यश्लोक । करीत जावे ॥ २३ ॥ मुलाचे चालीने चालावें । मुलाच्या मनोगते बोलावें । तैसें जनांस शिकवावें । हळुहळु ॥ २४॥ मुख्य मनोगत राखणे । हेचि चातुर्याची लक्षणे । चतुर तो चतुरांग जाणे । इतर ती वेडीं ॥ २५ ॥ १ चार्राकडचे ज्ञान, चारी अंगें. - -