पान:रामदासवचनामृत.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- १३३ 58.६] __ कर्मयोग. राखों जाणे नीतिन्याये। न करी न करवी अन्याये। कठीण प्रसंगी उपाये । करूं जाणे ॥ १८॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा। दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥१९॥ दा. ११. ६. १२-१९. ७६. " जंव उत्तम गुण न कळे । तो या जनास काये कळे." बोलतो खरें चालतों खरें । त्यास मानिती लहानथोरें । न्याये अन्याये परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥ लोकांस कळेना तंवरी। विवेके मा जो न करी । तेणेकरितां बराबरी। होत जाते ॥१६॥ जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना। चंदन आणि वृक्ष नाना। सगट होती ॥ १७ ॥ जंव उत्तम गुण न कळे । तो या जनास काये कळे । उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥१८॥ जगदांतर निवळत गेलें । जगदांतरीं सख्य जालें। मग जाणावें वोळले । विश्वजन ॥ १९॥ जनीं जनार्दनं वोळला । तरी काये उणे तयाला। राजी राखावें सकळांला । कठिण आहे ॥ २० ॥ पोरलें तें उगवतें । उसिणे द्यावे घ्यावे लागतें। वर्म काढितां भंगते। परांतर ॥ २१॥ लोकिकी बरेपण केलें । तेणें सांख्य वाढलें। उत्तरासारिखें आलें । प्रत्योत्तर ॥२२॥ १ धैर्य. २ क्षमा. ३ वश झाले.