पान:रामदासवचनामृत.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- -- -- रामदासवचनामृत-दासबोध. [sur उदंड धिःकारून बोलती । तरी चळों नेदावी शांती। दुर्जनास मिळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥ उत्तम गुगी शंघारला । ज्ञानवैराग्य शोभला। तोचि येक जाणाचा भला । भूमंडळी ॥ १७॥ स्वयें आपण कष्टावें । बहुतांचे सोशित जावें। झिजोन कीर्तीस उरवावें । नाना प्रकारें ॥ १८ ॥ कीर्ती पाहों जातां सुख नाहीं । सुख पहातां कीर्ती नाही। विचाविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ १९॥ परांतरास न लावावा ढका। कदापि पडों नेदावा चुका । क्ष्मासीळ तयाच्या तुका । हानी नाहीं ॥ २०॥ आपले अथवा परावें । कार्य अवघेचि करावें । प्रसंगी कामास चुकवावें । हे विहित नव्हे ॥ २१ ॥ वर बोलतां सुख वाटते। हे तो प्रत्यक्ष कळतें। आत्मवत् परावें तें। मानीत जावें ॥ २२ ॥ कठिण शब्द वाईट वाटतें । तो प्रत्ययास येतें। तरी मग वाईट बोलावें तें । काये निमित्य ॥ २३ ॥ आपणास चिमोटा घेतला। तेणें कासावीस जाला। आणावरून दुसन्याला । राखत जावें ॥ २४ ॥ जे दुसन्यास दुःख करी । ते अपवित्र वैखरी। आपणास घात करी। कोणियेके प्रसंगीं ॥२५॥ पेरिलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें। तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥२६॥ १ धका. २ क्षमा. ३ चिमटा.