Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§७४ ]
१२९
कर्मयोग.

उत्तम गुण तितुके ध्यावे । घेऊन जनास सिकवावे ।
उदंड समुदाये करावे । परी गुप्तरूपें ॥ १८ ॥
अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग ।
लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ॥ १९ ॥
आधी कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ ।
साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ॥ २० ॥
लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे ।
जाणजाणोन धरावे । जवळी दुरी ॥ २१ ॥
अधिकारपरत्वे कार्य होते । अधिकार नस्तां वेर्थ जातें ।
जाणोनि शोधावी चित्तें । नाना प्रकारें ॥ २२ ॥
अधिकार पाहोन कार्य सांगणे । साक्षेप पाहोन विश्वास धरणे ।
आपला मगज राखणे । कांहीं तरी ॥ २३ ॥
हे प्रचितीचें बोलिलें । आधी केले मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी येकें ॥ २४ ॥
महंतें महंत करावे । युक्तिबुद्धीने भरावे ।
जाणते करून विखरावे । नाना देसीं ॥ २५ ॥

दा. ११. १०.

७४. उत्तमपुरुषनिरूपण.
नेमकपणे वर्तो लागला । तो बहुतांस कळों आला ।
सर्व आर्जवी तयाला । काये उणें ॥ १४ ॥
ऐसा उत्तम गुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष ।
जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होये ॥ १५ ॥