पान:रामदासवचनामृत.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ रामदासवचनामृत-दासबोध. [ . वेषभूषण तें दूषण । कीर्तिभूषणं तें भूषण। चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी ॥७॥ त्यागी वोळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन । लोक शोधून पाहाती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥ पुर्ते कोणाकडे पाहेना । पुर्ते कोणासी बोलेना। पुते येके स्थळी राहेना । उठोन जातो ॥९॥ जातें स्थळ ते सांगेना । सांगितलें तेथें तरी जायेना। आपुली स्थिती अनुमाना। येवोंच नेदी ॥१०॥ लोकीं केलें तें चुकावी । लोकी भाविलें तें उलथवी । लोकीं तर्किलें तें दावी । निर्फळ करूनि ॥ ११ ॥ लोकांस पाद्याचा आदर । तेथें याचा अनादर । लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छया ॥ १२ ॥ एवं कल्पितां कल्पेना। ना तर्कितांहि तर्केना । कदापी भावितां भावेना । योगेश्वर ॥ १३॥ ऐस अंतर सांपडेना । शरीर ठाई पडेना। क्षण येक विशंभेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥ लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघोच निर्फळ होती। जनाची जना लाजवी वृत्ति । तेव्हां योगेश्वर ॥१५॥ बहुती शोधून पाहिले । बहुतांच्या मनास आलें। तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥१६॥ अखंड येकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा। काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥ १७॥ . . १ विचार. २ सोडीना.