पान:रामदासवचनामृत.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३] कर्मयोग स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे । ज्ञानदृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांडनिरास । मग ते ब्रह्म निराभास। येथूनि तेथवरी अवकास । भकासरूप ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक है तो खरें। दृश्य आहे तो हैं उत्तरें। व्याविण कोण्या प्रकारे । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥ दा. २०.१०.१-२३. ४. कर्मयोग. ७३. निःस्पृहवर्तणूक. मूर्ख येकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो । जैसा बहुधा होऊन भोगितो। नाना सुखें ॥१॥ तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥२॥ कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळी सर्व सत्ता। त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणु ॥३॥ ऐसें महंते असावें । सर्व सार शोधून घ्यावें । पाहों जातां न संपडावें । येकायेकी ॥४॥ कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त । वेष पहातां शाश्वत । येकहि नाहीं॥५॥ प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनास कळेना। पाहों जातां आढळेना । काये कैसें ॥ ६ ॥ १शून्य.