Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
[§७२
रामदासवचनामृत-दासबोध.
पक्षी अंतराळी गेला । भोवतें आकाशचि तयाला ।
तैसें ब्रह्म प्राणीयांला । व्यापून आहे ॥ ९ ॥
परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवढाचा सेवट ।
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥
दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं ।
आरे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥
वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकी चौदा लोकीं ।
पन्नगादिक पाताळलोकीं । तेथेहि आहे ॥ १२ ॥
कासीपासून रामेश्वर । आवघे दाटलें अपार ।
परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥
परब्रह्म तें येकलें । येकदाचि सकळांसी व्यापिलें ।
सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाई ॥ १४ ॥
परब्रह्म पाउसे भिजेना । अथवा चिखलाने भरेना ।
पुरामधे परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥
येकसरें सन्मुख विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक ।
आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥
आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला ।
असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥
येकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास ।
भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥
संतसाधुमाहानुभावां । देवदानवमानवां ।
ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥
कोणेकडे सेवटा जावें । कोणीकडे काये पाहावें ।
असंभाव्य ते नेमावें । काये म्हणोनि ॥ २० ॥