पान:रामदासवचनामृत.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.१] साक्षात्कार. जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे । विज्ञानवृत्ति मुरे । परब्रह्मीं ॥ ५१ ॥ ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत । योगी जना येकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२ ॥ दा. ७. ४. ७२. ब्रह्माचें सर्वगत अस्तित्व. धरूं जातां धरितां नये । टाकू जातां टाकितां नये। जेथे तेथे आहेच आहे । परब्रह्म तें ॥१॥ जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें। सन्मुखपण चुकेना तें । कांही केल्यां ॥२॥ बैसले माणुस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिले । आकाश चहुंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३॥ जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें। तिकडे आकाशचि भोंवतें बळें आकाशाबाहेर तें। कैसें जावें ॥४॥ जिकडे जिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकी राहे । माध्यानी मार्तड जैसा ॥५॥ परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी। कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥६॥ नाना तीर्थं नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी। तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठाई ॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८॥ - - . १ पहावयासी.