पान:रामदासवचनामृत.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६७१ १२४ रामदासवचनामृत-दासबोध. नभी धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसे दावी वोडंबरं । माया देवी॥४०॥ ऐसी माया अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत। सर्वा ठाई सदोदित । भरले असे ॥ ४१ ॥ पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमधेचि आहे । नेत्री रिघोनि राहे । मृदपणे ॥ ४२ ॥ श्रवणे शब्द ऐकतां । मनें विचार पाहातां । मना सवाद्य तत्वतां । परब्रह्म तें ॥ ४३ । चरणे चालतां मार्गी । जें आडळे सर्वागीं। करें घेतां वस्तुलागीं। आडवें ब्रह्म ॥ ४४॥ असो इंद्रियेंसमुदाव। तयामधे वर्ते सर्व। जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥ तें जवळिच असे । पाहों जातां न दिसे। न दिसोन वसे । कांहीं येक ॥ ४६॥ . जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टिचेनि अभावें । आपुलेन स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७॥ ज्ञानदृष्टीचे देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे। अंतरवृत्तीचिये खुणे। अंतरवृत्ति साक्ष ॥४८॥ जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया। ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥४९॥ साक्षत्व वृत्तीचे कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण । जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥५०॥ R . १ अवडंबर, मिथ्या खेळ. २ अक्षरें