पान:रामदासवचनामृत.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ७१] साक्षात्कार. वायोहून ते गगन । अत्यंतचि मृद जाण । गगनाहून मृद पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९॥ वज्रास असें भेदिले । परी मृदुत्व नाहीं गेलें। उपमेराहित संचलें । कठिण ना मृद ॥ ३०॥ पृथ्वीमधे व्यापून असे । पृथ्वी नासे तें न नासे। जळ शोषे तें न शोषे । जळी असोनि ॥ ३१॥ तेजीं असे परी जळेना । पवनी असे परी चळेना। गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२ ॥ शरीर अवघे व्यापलें । परी तें नाहीं आडळलें। जवळिच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३ ॥ सन्मुखचि चहूंकडे । तयामधे पाहाणे घडे। बाह्याभ्यांतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४॥ तयामधेचि आपण । आपणा सबाह्य तें जाण । दृश्यावेगळी खूण । गगनासारिखी॥ ३५ ॥ कांहीं नाहींसें वाटले । तेथेंचि ते कोंदाटलें। जैसे न दिसे आपलें। आपणांसि धन ॥ ३६॥ जो जो पदार्थ दृष्टी पडे । ते त्या पदार्था ऐलिकडे । अनुभवें हें कुवाडें। उकलावै ॥ ३७॥ मागे पुढे आकाश । पदार्थेविण जो पैस। पृथ्वीविण भकास। येकरूप ॥ ३८॥ जें जें रूप आणी नाम । तो तो नाथिलाच भ्रम । नामरूपातीत वर्म। अनुभवी जाणे ॥ ३९॥ . १ कोडे. २ अवकाश. ३ खोटा.