पान:रामदासवचनामृत.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ रामदासवचनामृत-शासबोध. [$७१ अमृतीमधे आकाश । सगळे साठवितां प्रयास । म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो॥१८॥ ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें। सर्वामधे परी संचलें । संचलेपणे ॥ १९ ॥ पंचभूती असे मिश्रित । परंतु ते पंचभूतातीत । पंकी आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २०॥ ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणे घडे। परी दृष्टांती साहित्य पडे । विचारिता आकाश ॥ २१ ।। खंब्रह्म ऐसी श्रुती। गगनसदृशं हे स्मृती। म्हणोनि ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥ काळिमा नस्तां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । सुन्यत्व नस्तां निवळ । आकाश ब्रह्म ।। २३ ॥ म्हणोनि ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन। आडळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥ शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा। परंतु ते स्थिरावेना । वायुच ऐसी ॥ २५ ॥ असो ऐसी माया माईक । शाश्वत तें ब्रह्म येक। पाहों जातां अनेक । व्यापून आहे ॥ २६॥ पृथ्वीसी भेदून आहे । परी तें ब्रह्म कठीण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदत्वासी ॥२७॥ पृथ्वीहूनि मृद जळ । जळाहूनि तो अनळ । अनळाहूनि कोमळ । वायो जाणावा ॥२८॥ १ गिंडी. २ समजावयासाठी. ३ सामग्री.