पान:रामदासवचनामृत.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साक्षात्कार. १२१ आकाशाबाहेरी पळों जातां । पुढे आकाशेंचि तत्वतां । तैसा तया अनंता। अंतचि नाहीं ॥ ७॥ परी जें अखंड भेटले । सर्वांगास लिगटले । अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥८॥ तयामधेचि असिजे । परी तयास नेणिजे। उमजे भास नुमजे । परब्रह्म ते॥९॥ आकाशामधे आभाळ । तेणं आकाश वाटे डहुंळ । परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १० ॥ नेहार देतां आकाशीं । चक्रे दिसती डोळ्यांसी। तसे दृश्य ज्ञानियांसी। मिथ्यारूप ॥ ११ ॥ मिथ्याचि परी आभासे । निद्रिस्तांस स्वप्न जैसें । जागां जालियां अपैसें । बुझो लागे ॥१२॥ तैसें आपुलेन अनुभवें । ज्ञाने जागृतीसि यावें। मग माईक स्वभावें । कळों लागे ॥ १३॥ आतां असो हे कुवाडे । जें ब्रह्मांडापलीकडे । तेंचि आतां निवाडें । उमजोन दाऊं ॥१४॥ ब्रह्म ब्रह्मांडी कालवलें । पदार्थासी व्यापोन ठेलें। सर्वामधे विस्तारलें। अंशमात्रं ॥१५॥ ब्रह्मामधे सृष्टि भासे। सृष्टिमधे ब्रह्म असे। अनुभव घेतां आभासे । अंशमात्र ॥१६॥ अंशमाने सृष्टीभीतरी । बाहेरी मर्यादा कोण करी। सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । माईल कैसें । १७॥ १ गढूळ. २ दृष्टि. ३ आपोआप. ४ समजों. ५ को.. ६ निश्चयानें. -