पान:रामदासवचनामृत.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० रामदासवचनामृत-दासबोध. वेद विरंची आणी शेष । जेथें सिणले निशेष । तेंचि साधावें विशेष । परब्रह्म तें ॥२४॥ तरी ते कोणेपरी साधावें । तेंचि बोलिलें स्वभावें। अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥ २५ ॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे । वर्णवक्त ऐसें नव्हे । अव्यक्त तें ॥ २६॥ तयास म्हणावे देव । वरकड लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव । जनाकारणे ॥ २७॥ दा. ६. २. १५-२७. ७१. विमळब्रह्मनिरूपण. ब्रह्म नभाहून निर्मळ । पाहातां तैसेंचि पोकळ । अरूप आणि विशाळ । मर्यादेवेगळें ॥१ येकवीस स्वर्गे सप्त पाताळ । मिळोन येक ब्रह्मगोळ । ऐसी अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २॥ अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतं । तेणवण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥३॥ जळी स्थळी काष्ठी पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी। तेणेंविण रिता प्राणो । येकही नाहीं ॥४॥ जळचरांस जैसे जळ । बाह्याभ्यांतरी निखळ । तैसें ब्रह्म हे केवळ । जीवमात्रांसी॥५॥ जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां नये। . म्हणौनि उपमा न साहे । जळाची तया ॥६॥ १ ब्रह्मदेव. २ व्यक्ति. ३ निखिल, पूर्णपणे.