पान:रामदासवचनामृत.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११९ ६७.] साक्षात्कार. अनंत जन्मींचे पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे । मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४ ॥ दा. १.९. १.२४. ७०. प्रचीतिनिरूपण, तें हैं दृश्य नासिवंत । ऐसें वेद श्रुति बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥ में शस्त्रे तोडितां तुटेना । जे पावकें जाळितां जळेना । कालवितां कालवेना। आपेंकरुनी ॥१६॥ में वायोचेनि उडेना । जे पडेना ना झडेना । जें घडेना ना दडेना । परब्रह्म ते ॥ १७॥ ज्यासी वर्णचि नसे । जें साहूनि अनारिसें। परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८॥ दिसेना तरी काय जालें। परंतु तें सर्वत्र संचलें। सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथे तेथें ॥ १९॥ दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें। परंतु गुज तें जाणावें । गोप्य आहे ॥ २०॥ प्रगट तें जाणावें असार । आणी गुप्त तें जाणावें सार । गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥२१॥ जें उमजेना तें उमजावें । जें दिसेना ते पाहावें। जे कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥ २२ ॥ गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें ॥ कॉनडेंचि अभ्यासावें। सावकाश ॥२३॥ १ संवय. २ गौप्य, गुप्त. ३ कठीण, -