पान:रामदासवचनामृत.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची। आणी पदवी सायोज्यतेची। सन्निधची लाभे ॥ १३ ॥ माया विवेके मावळे । सारासार विचार कळे । परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४ ॥ ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड। पंचभूतांचे थोतांड । तुच्छ वाटे ॥ १५॥ प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका। शुद्ध आत्मा विवेका । अंतरीं आला ॥ १६ ॥ ब्रह्मास्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी । दृश्याची जुनी जर्जरी। कुहिट जाली ॥१७॥ ऐसा हा परमार्थ। जो करी त्याचा निजस्वार्थ । आतां या समर्थास समर्थ। किती म्हणोनि म्हणावें ॥ १८ ॥ या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता। योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९॥ परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां । सेखीं सात्विक जडजीवां । सत्संगेंकरूनि ॥ २० ॥ परमार्थ जन्माचे सार्थक । परमार्थ संसारीं तारक। परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१॥ परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार । परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २१॥ परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी। या परमार्थाची सरी । कोणांस द्यावी ॥ २३ ॥ - ____ १ लपंडाव, मिथ्या. २ विटली. ३ शेवटी.