Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§६९ ]
११७
साक्षात्कार.
आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम ।
कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २ ॥
नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार ।
वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३ ॥
आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे ।
उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४ ॥
आकाशमार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ ।
इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५ ॥
साराचेही निजसार । अखंड अक्षै[] अपार ।
नेऊ न सकती तश्कर[] । कांही केल्या ॥ ६ ॥
तयासि नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये ।
अथवा स्वापदभये । बोलोंच नये ॥ ७ ॥
परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही[] चुकेना ।
काळांतरी चळेना । जेथींचा तेथें ॥ ८ ॥
ऐसें तें निज ठेवणें । कदापी पालटों नेणे ।
अथवा नव्हे आदिक[] उणें । बहुतां काळें ॥ ९ ॥
अथवा तें घसवटेना[] । अथवा अदृश्य होयेना ।
नातरी पहातां दिसेना । गुरुअंजनेंविण ॥ १० ॥
मागा योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ ।
यासी बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११ ॥
जेंहीं शोधून पाहिला । त्यांसी अर्थ सांपडला ।
येरां असोनि अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२ ॥

  1. सदोदित.
  2. चोर.
  3. जागा.
  4. अधिक.
  5. झिजेना.