पान:रामदासवचनामृत.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ रामदासवचनामृत-दासबोध. [६५. जेथें उपाये तोचि अपाये । आणी अपाये तोचि उपाये। हे अनुभवेंविण काये । उमजों जाणे ॥ २३ ॥ दा. ७. ७. १९-२३. ६८. " जैसा भाव जयापासीं । तैसा देव तयासी." जैसा भाव जयापासीं। तैसा देव तयासी। जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणिमात्रांचा ॥ १३ ॥ जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक। नवल तयाचे कौतुक । जैशास तैसा ॥ १४ ॥ जैसें जयाचें भजन । तैसेंचि दे समाधान । भाव होतां किंचित न्यून । आपणही दुरावे ॥ १५ ॥ दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैशास तैसें भासे। तयाचे सूत्र असे । आपणाचपासीं ॥१६॥ जसे आपण करावें । तैसेचि तेणे व्हावें। जरी डोळे पसरूनि पाहावें । तरी तेंहि टवकारे ॥ १७ ॥ भृकुटीस घालोनि मिठी । पाहातां क्रोधे तेंहि उठी। आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८॥ जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला। जो जैसें भजे त्याला । तैसाचि वोळे ॥१९॥ दा. ३. १०. १३–१९. ६९. परमार्थवर्णन. आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ । नांतरी समर्थामध्ये समर्थ। योग हा ॥१॥ खोटा.