या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§६७ ]
११५
साक्षात्कार.
नाना व्यापार करिती जन । आवघेचि म्हणती सकांचन ।
परंतु कुबेराचें महिमान । कोणासीचि नये ॥ १५ ॥
तैसा ज्ञानी योगेश्वर । गुप्तार्थलाभाचा ईश्वर ।
इतर ते पोटाचे किंकर । नाना मतें धुंडिती ॥ १६ ॥
तस्मात् सार तें दिसेना । आणी असार तें दिसे जना ।
सारासार विवंचना । साधु जाणती ॥ १७ ॥
इतरांस हे काय सांगणें । खरे खोटें कोण जाणे ।
साधुसंतांचिये खुणे । साधुसंत जाणती ॥ १८ ॥
दिसेना में गुप्त धन । तयासि करणे लागे अंजन ।
गुप्त परमात्मा सज्जन-। संगतीं शोधावा ॥ १९ ॥
रायाचे सन्निध होतां । सहजचि लाभे श्रीमंतता ।
तैसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे ॥ २० ॥
दा. ६. ९. १-२०.
६७. अनुभवाचे उलट सुलट प्रकार.
तें आठवितां विसरिजे । कां ते विसरोनि आठविजे ।
जाणोनियां नेणिजे । परब्रह्म ते ॥ १९ ॥
त्यास न भेटतां होये भेटी । भेटों जातां पडे तुटी ।
ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २० ॥
ते साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना ।
लागला संमंध तुटेना । निरंतर ॥ २१ ॥
ते असतचि सदा असे । नातरी पाहातां दुरासे[१] ।
न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२॥
जाणोनियां नेणिजे । परब्रह्म ते ॥ १९ ॥
त्यास न भेटतां होये भेटी । भेटों जातां पडे तुटी ।
ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २० ॥
ते साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना ।
लागला संमंध तुटेना । निरंतर ॥ २१ ॥
ते असतचि सदा असे । नातरी पाहातां दुरासे[१] ।
न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२॥
- ↑ दूर असे.