पान:रामदासवचनामृत.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ रामदासवचनामृत-दासबोध. ६६ द्रव्य ठेऊन जळ सोडिलें । लोक म्हणती सरोवर भरलें । तयाचें अभ्यांतर कळलें । समर्थ जनासी ॥४॥ तैसे ज्ञाते ते समर्थ । तोहें वोळखिला परमार्थ । इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थाचा ॥ ५॥ काबाडी वाहाती काबाड । श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड। हे जयाचे तयास गोड । कर्मयोगें ॥६॥ येक काष्ठस्वार्थ करिती । येक शुभा येकवाटिती। तैसे नव्हेत की नृपती । सारभोक्ते ॥ ७॥ जयांस आहे विचार । ते सुकासनी जाले स्वार । इतर जवळिल भार । वाहताच मेले ॥८॥ येक दिव्यान्ने भक्षिती। येक विष्ठा सावड़िती। आपण वर्तल्याचा घेती । साभिमान ॥९॥ सार सेविजे श्रेष्ठीं। असार घेइजे वृथापृष्टी । साराअसाराची गोष्टी। सज्ञान जाणती ॥१०॥ गुप्त परीस चिंतामणी । प्रगट खडे कांचमणी । गुप्त हेमरत्नखाणी । प्रगट पाषाण मृतिका ॥ ११ ॥ अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पति अमोल । येरंड धोत्रे बहुसाल । प्रगट सिंपी॥१२॥ कोठे दिसेना कल्पतरु । उदंड सेरांचा विस्तारु । पाहातां नाहीं मळियागरु । बोरि बाभळा उदंडी ॥ १३ ॥ कामधेनु जाणिजे इंद्रे । सृष्टींत उदंड खिल्लारें। महद्भाग्य भोगिजे नृपवरें । इतर कर्मानुसार ॥ १४॥ १ गोवऱ्या. २ एकत्र करितात. ३ मुख सनीं. ४ वृथापुष्ट. ५ उजवीकडच्या तोंडाचा ६ शेर, चंदन, ८ पुष्कळ. -