पान:रामदासवचनामृत.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६६] - साक्षात्कार. ११३ परमेश्वरास वोळखिलें । आपण कोणसे कळले।। आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥ ब्रह्मांड कोण केलें । कासयाचे उभारिलें। मुख्य कास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥ येथे अनुमान राहिला। तरी परमार्थ केला तो वायां गेला । प्राणी संशई बुडाला। प्रचितीविण ॥ २४ ॥ हे परमार्थाचें वर्म । लटिकें बोलेल तो अधम । लटिकें मानील तो अधमोद्धम । येथार्थ जाणावा ॥ २५ ॥ येथे बोलण्याची जाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा । असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूं जाणसी ॥ २६ ॥ माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सांगावे साचार। मिथ्या बोलता उत्तर । प्रभूस लागे ॥ २७ ॥ म्हणौनि सत्यचि बोलिलें । कास पाहिजे वोळखिलें। मायोद्भवाचे शोधिलें । पाहिजे मूळ ॥ २८ ॥ दा. १०. ८. २१-२८. ६६. योग्यांच्या गुप्तधनाचे वर्णन. गुप्त आहे उदंड धन । काय जाणती सेवक जन। तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचें ॥१॥ गुप्त ठेविले उदंड अर्थ । आणी प्रगट दिसती पदार्थ । शाहाणे शोधिती स्वार्थ । अंतरी असे ॥२॥ तैसें दृश्य हे माईक । पाहात असती सकळ लोक। परी जयांस ठाउका विवेक । ते तदनंतर जाणती ॥३॥ १ थोरपणा. २ शब्द. ३ तदंतर, त्यांचे रहस्य.