Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
[§६४
रामदासवचनामृत-दासबोध.

रंक होता राजा झाला । बरे पाहातां प्रत्ययो आला ।
रंकपणाचा गल्बला । रंकी करावा ॥ २९ ॥
वेदशास्त्रे पुराणें । नाना साधनें निरूपणें ।
सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करितो ॥ ३० ॥
तें ब्रह्मरूप आपणाच आंगें । सारासारविचारप्रसंगें ।
करणे न करणे वाउगें । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
रंक राजआज्ञेसि भ्यालें । तेंचि पुढे राजा जालें ।
मग ते भयेचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥
वेदें वेदाज्ञेनें चालावें । सच्छास्त्रे शास्त्र अभ्यासावें ।
तीर्थे तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥
अमृतें सेवावें अमृत । अनंते पाहावा अनंत ।
भगवंतें लक्षावा भगवंत । कोण्या प्रकारें ॥ ३४ ॥
संतें असंत त्यागावें । निर्गुणें निर्गुणासी भंगावें ।
स्वरूपे स्वरूपी रंगावें । कोण्या प्रकारे ॥ ३५ ॥
अंजने ल्यावें अंजन । धनें साधावें धन ।
निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥
साध्य[] करावें साधनासी । ध्येये[] धरावें ध्यानासी ।
उन्मनें आवरावें मनासी । कोण्याप्रकारें ॥ ३७ ॥

दा. ९. १०. १७-३७.

६५. साक्षात्कार झाला हे कशावरून ओळखावें ?
पापाची खंडणा जाली । जन्मयातना चुकली ।
ऐसी स्वयें प्रचित आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥

  1. साध्याने.
  2. ध्यान.