पान:रामदासवचनामृत.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"११० रामदासवचनामृत-दासबोध. [६७ ना ते साधन ना तें देह । आपला आपण निःसंदेह । देहींच असोन विदेह- स्थिति ऐसी ॥ ६३ ॥ साधनेंविण ब्रह्म होतां । लागों पाहे देहममता। आळस प्रबळे तत्वतां । ब्रह्मज्ञानमिसें ॥ ६४॥ परमार्थमिसें अर्थ जागे । ध्यानमिसें निद्रा लागे। मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता ॥६५॥ निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें वेवाद पडे । उपाधीमिसें येऊन जडे । अभिमान आंगीं ॥६६॥ तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरीं प्रवेशे। म्हणे साधनाचें पिसे । काय करावे ॥ ६७ ॥ " किं करोमि व गच्छामि किं गृण्हामि त्यजामि किम्। आत्मना पूरितं सर्व महाकल्पांबुना यथा " ॥१॥ वचन आधारी लाविलें । जैसे शस्त्र फिरविलें। स्वता हाणोन घेतलें । जयापरी ॥ ६८॥ तैसा उपायाचा अपाये । विपरीतपणे स्वहित जाये। साधन सोडितां होये । मुक्तपणे बद्ध ॥६९॥ साधन करितांचि सिद्धपण । हातींचे जाईल निघोन । तेणें गुणें साधन । करूंच नावडे ॥ ७० ॥ लोक म्हणती हा साधक । हेचि लज्या वाटे येक। साधन करिती ब्रह्मादिक । हे ठाउकें नाहीं ॥७१ ॥ दा. ७. ७.५४-७१. ६४. “कुल्लाळ पावला राज्यपदवी। आतां रासमें कासया राखावी." साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें। आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७॥ १ मिषाने. २ यथेच्छ वर्तणूक. ३ सलोखा. ४ पेड,