Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§६३
१०९
साक्षात्कार.

तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा ।
दृश्यपदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१ ॥

दा. ७. १०, ७-३१.

६३. “साधन सोडिता होये । मुक्तपणे बद्ध."
मी तों ब्रह्मचि जालों स्वतां । साधन कोण करील आता ।
ऐसे मनी कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४ ॥
ब्रह्मीं कल्पना न साहे । तेचि तेथे उभी राहे ।
तयेसि शोधून पाहे । तोचि साधु ॥ ५५ ॥
निर्विकल्पासी कल्पावें । परी कल्पिते आपण न व्हावें ।
मीपणासी त्यागावें । येणें रिती ॥ ५६ ॥
या ब्रह्मविद्येच्या लपणी[] । कांहींच नसावें असोनि ।
दक्ष आणी समाधानी । तोचि हे जाणे ॥ ५७ ॥
जयासी आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें ।
तेथें कल्पनेच्या नांवें । सुन्य आलें ॥ ५८ ॥
पदींहून चळों नये । करावे साधन उपाये ।
तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची ॥ ५९ ॥
राजा राजपदी असतां । उगीच चाले सर्व सत्ता ।
साध्यचि होऊन तत्वता । साधन करावें ॥ ६० ॥
साधन आले देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा ।
ऐसा करूनि अकर्ता । सहजचि जाला ॥ ६१ ॥
देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें ।
देहातीत अस्तां स्वभावें । देह कैंचा ॥ ६२ ॥

  1. लपंडाव.