Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
[§६२
रामदासवचनामृत-दासबोध.
दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना ।
ऐसें हे वाक्य जना । ठाउकेंचि आहे ॥ २० ॥
न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठे मुशारा[]
तैस अंती अभक्त नरां । स्वहित न घडे ॥ २१ ॥
जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती ।
असो जे जे जैसें करिती । ते ते पावती तैसें ॥ २२ ॥
एवं न करितां भगवद्भजन । अंती नव्हीजे[] पावन ।
जरी आलें बरें मरण । तरी भक्तीविण अधोगती ॥ २३ ॥
म्हणोन साधूनें आपलें । जीत अस्तांच सार्थक केलें ।
शरीर कारणी लागलें । धन्य त्याचें ॥ २४ ॥
जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचे शरीर पडो रानी ।
अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य जालें ॥ २५ ॥
साधूचा देह खितपला । अथवा श्वानादिकी भक्षिला ।
हे प्रशस्त न वाटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥
अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन ।
परी बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥
जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्य येईल कैंचा ।
विवेकबळें जन्ममृत्याचा । घोट[] भरिला जेणें ॥ २८ ॥
स्वरूपानुसंधानबळें । सगळी मायाच नाडळे[]
तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९ ॥
तो जीतचि असतां मेला । मरणास मारून ज्याला[]
जन्ममृत्य न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३० ॥

  1. पगार.
  2. न होईजे.
  3. घुटका.
  4. सांपडत नाही.
  5. जगला.