पान:रामदासवचनामृत.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६२] - साक्षात्कार. १०७ -- -- । प्रारब्धी टाकिला देहो । बोधे फिटला संदेहो। आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कळीवर ॥९॥ ज्ञानियांचे जे शरीर । तें मिथ्यत्वे निर्विकार । जेथे पडे तेंचि सार । पुण्यभूमी ॥ १० ॥ साधुदर्शने पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ। साधु न येतां जिणे वेर्थ । तया पुण्यक्षेत्रांचें ॥११॥ पुण्यनदीचे जें तीर । तेथे पडावें शरीर। हा इतर जनाचा विचार । साधु तो नित्यमुक्त ॥ १२ ॥ उत्तरायेण ते उत्तम । दक्षणायेन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेह ॥१३॥ शुक्लपक्ष उत्तरायेण । गृहीं दीप दिवा मरण । अंती राहावें स्मरण । गतीकारणें ॥१४॥ इतुकें नलगे योगियासी । तो जीतचि मुक्त पुण्यरासी । तिळांजुळी पापपुण्यासी। दिधली तेणें ॥ १५ ॥ देहाचा अंत बरा आला। देह सुखरूप गेला। त्यासी म्हणती धन्य जाला । अज्ञान जन ॥ १६ ॥ जनाचे विपरीत मत । अंती भेटतो भगवंत। ऐसें कल्पून धात। करिती आपुला स्वयें ॥१७॥ जितां सार्थक नाहीं केलें । वर्थ आयुष्य निघोन गेलें । मुळी धान्येचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैचें ॥ १८ ॥ जरी केलें ईश्वरभजन । तरीच होईजे पाचन ।। जैसें वेव्हारितां धन । ससि माथां लागे ॥ १९॥ . १ कलेवर, शरीर. २ राशि.