पान:रामदासवचनामृत.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ रामदासवचनामृत-दासबोध. ६१. मुक्तिचतुष्टयनिरूपण. येथे ज्या देवाचे भजन करावें । तेथे ते देवलोकी राहावें। सलोकता मुक्तीचे जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३ ॥ लोकी राहावें ते सलोकता। समीप असावे ते समीपता। स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता । तिसरी मुक्ती ॥ २४ ॥ देवस्वरूप जाला देही। श्रीवत्स को तुभ लक्ष्मी नाहीं। स्वरूपतेचे लक्षण पाही । ऐसें असे ॥ २५॥ सुकृत आहे तो भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती। आपण देव ते असती। जैसे तैसे ॥ २६ ॥ म्हणोनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ति ते शाश्वत है। तोहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥ ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती । तेव्हां अवधेच देव जाती। मां मुक्ति कैच्या तेथें ॥ २८ ॥ तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति तेही अचळ । सायोज्यमुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥२९॥ __ दा. ४.१०. २३-२९, ६२. जीवन्मुक्तलक्षण. मागां जालें निरूपण । देखिलें आपणासि आपण। तेणे बाणली खूण । परमार्थाची ॥७॥ तेणें समाधान जालें । चित्त चैतनी मिळालें। निजस्वरूपें वोळखिलें । निजवस्तुसी ॥ ८॥ १ मग. २ चैतन्यांत, आत्मस्वरूपात.