पान:रामदासवचनामृत.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__ १०५ .६० ] साक्षात्कार. तैसा भगवंती मिळाला । तो न बचे वेगळा केला। देव भक्त आपण जाला। विभक्त नव्हे ।। २२ ॥ देव भक्त दोनी येक । ज्यासी कळला विवेक । साधुजनीं मोक्षदायेक । तोचि जाणावा ॥ २३ ॥ आतां असो हे बोलणें । देव पहावा भक्तपणे । तेणे त्याचे ऐश्वर्य वाणे । तत्काळ आंगीं ॥ २४॥ ___ दा. ८. ८. ९-२४. ६०, आत्मनिवेदन म्हणजेच आत्मज्ञान. आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें। आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ ३९ ॥ आधी अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन । पुढे आत्मानिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥ आत्मनिवेदनाउपरी । निखळ वस्तु निरंतरीं । आपण आत्मा अंतरीं । बोध जाला ॥४१॥ त्या ब्रह्मबोधे ब्रह्मचि जाला । संसारखेद तो उडाला। देहो प्रारब्धी टाकिला । सावकास ॥ ४२ ॥ यासी म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न । भक्तचि जाला ॥४३॥ आता होणार तें होयेना कां । आणि जाणार तें जायेना कां। तुटली मनांतील आशंका। जन्ममृत्याची ॥ ४४ ॥ संसारीं पुंडावें चुकलें । देवां भक्तां ऐक्य जालें। मुख्य देवास वोळखिलें । सत्संगेंकरूनि ॥४५॥ .. - दा. ६. २. ३९-४५. १ येरझारा करणे.