पान:रामदासवचनामृत.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [६५९ आपणांस कैसे निवेदावें। कोठे जाऊन पडावें। किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥ ऐसें ऐकोन बोलणें। वक्ता बदे सर्वज्ञपणे । श्रोतां सावधान होणें । एकाग्रचित्तें ॥ १२॥ आत्मनिवेदनाचे लक्षण । आधी पाहावें मी कोण । मग परमात्मा निर्गुण । तो ओळखावा ॥ १३ ॥ देवाभक्ताचे शोधन । करितां होतें आत्मनिवेदन । देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥ देवास वोळखों जातां । तेथें जाली तद्रूपता। देवभक्तविभक्तता । मुळीच नाहीं॥ १५॥ विभक्त नाही म्हणोन भक्त । बंद्धन नाही म्हणोनि मुक्त। अयुक्त नाहीं बोलणे युक्त । शास्त्राधारे ॥ १६ ॥ देवाभक्ताचे पाहातां मूळ । होये भेदाचे निर्मूळ । येक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥ तयासि होतां मिळणी । उरी नाही दुजेपणीं। देवभक्त हे कडसणी । निरसोन गेली ॥१८॥ आत्मनिवेदनाचे अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती।। तये नांव सायोज्यमुक्ती। सत्य जाणावी ॥१९॥ जो संतांस शरण गेला । अद्वैतनिरोपणे बोधला। मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २०॥ नदी मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी । लोहो सोने होतां माघारीं । काळिमा नये ॥२१॥ १ बंधम. २ मेदबुद्धि.