पान:रामदासवचनामृत.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। ६५९] साक्षात्कार. देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला। शरणगतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५ ॥ देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी। देव होय साहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥ देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धांविनला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणे ॥ २७ ॥ . देव कृपेचा सागर । देव करुणेचा जळधरु। देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८ ॥ देव प्रीती राखों जाणे । देवासि करावें साजणें। जिवलगें आवघीं पिसुणे । कामा न येती ॥ २९॥ सख्य देवाचें तुटेना। प्रीति देवाचि विटेना। देव कदा पालटेना। शरणागतांसी ॥ ३०॥ म्हणोनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें। आठवें भक्तीचे जाणावें। लक्षण ऐसें ॥३१॥ जैसा देव तैसा गुरू । शास्त्रीं बोलिला हा विचारू । म्हणौन सख्यत्वाचा प्रकारू । सद्गुरूसी असावा ॥ ३२ ॥ ___दा, ४. ८. ५९. आत्मनिवेदनभक्ति. महापूजेचा अंतीं । देवास मस्तक वाहाती। तैसी आहे निकट भक्ती । आत्मनिवेदनाची॥९॥ आपणास निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती। तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो॥ १०॥ १ सख्य.