पान:रामदासवचनामृत.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ रामदासवचनामृत-दासबोध. [५८ “ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । १ । जैसें जयाचें भजन । तैसाचि देवही आपण । म्हणौन हे अवघे जाण । आपणाचिपासीं ॥ १४ ॥ आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे । तरी गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ॥ १५॥ मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना। चंद्र वेळेसि उगवेना । तरी चकोर अनन्य ॥ १६ ॥ ऐसे असावें सख्यत्व । विवेके धरावें सत्व। भगवंतावरील ममत्व । सांडूंचि नये ॥ १७॥ सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत। विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८॥ देवावेगळे कोणी नाहीं । ऐसें बोलती सर्वही। परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९॥ म्हणोनि ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें। अंतरीं सदृढ धरावें । परमेश्वरासी ॥२०॥ आपुलिया मनोगताकारणे । देवावरी क्रोधास येणें । ऐसी नव्हेत की लक्षणे । सख्यभक्तीची ॥ २१ ॥ देवाचे जे मनोगत । तेंचि आपुले उचित । इच्छेसाठी भगवंत । अंतरूं नये की॥ २२ ॥ देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें। मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३ ॥ पहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी । माता वधी बाळकासी। विपत्तिकाळीं ॥ २४॥