पान:रामदासवचनामृत.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८] । साक्षात्कार. देवास जयाची अत्यंत प्रीति । आपण वर्तावें तेणे रीती। येणेकरितां भगवंतीं। सख्य घडे नेमस्त ॥ ३॥ भक्ति भाव आणी भजन । निरूपण आणी कथाकीर्तन। प्रेमळ भक्तांचे गायन । आवडे देवा ॥४॥ आपण तैसेचि वावें । आपणांसि तेच आवडावें। मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥५॥ . देवाच्या सख्यत्वाकारणें। आपले सौख्य सोडून देणें। अनन्यभावे जिवे प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६॥ . सांडून आपली संसारवेथा.। करित जावी देवाची चिंता। निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचिं सांगाव्या ॥७॥ देवाच्या सख्यत्वासाठीं। पडाव्या जिवलगांसी तुटी। सर्व अर्पा सेवटीं। प्राण तोहि वेंचावा ॥ ८॥ आपुलें अवघेचि जावें। परी देवासी सख्य राहावें। ऐसी प्रीती जीवें भावें । भगवंती लागावी ॥९॥ देव मणिजे आपुला प्राण । प्राणासि न करावें निर्वाण । परम प्रीतीचे लक्षण । तें हैं ऐसें असे ॥ १०॥ ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता। पांडव लाखाजोहरी जळतां । विवरद्वारे काढिले ॥११॥ देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं। आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२ ॥ आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे। आपण त्रास घेतां जीवें । देवहीं त्रासे ॥१३॥ १ अमीत. २ प्रत्युत्तरें.